भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा

jevile te sant magen ushtavali | avaghya patravali karuni jhada

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥१॥ सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा । पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ध्रु.॥ परें परतें मज न लागे सांगावें । हें तों देवें बरें शिकविलें ॥२॥ दुसर्यातें आम्ही नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥३॥ येथें कोणीं कांहीं न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥४॥ लांचावला तुका मारितसे झड । पुरविलें कोड नारायणें ॥५॥