भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैसा केला तैसा होय आपोआप । संकल्प विकल्प न धरी कांहीं

jaisa kela taisa hoy apoap | sankalpa vikalpa na dhari kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जैसा केला तैसा होय आपोआप । संकल्प विकल्प न धरी कांहीं ॥१॥ न म्हणे उंच नीच यातीकुळ । वर्ण व्यक्ति शील न पाहेची ॥२॥ उच्छिष्ट तें प्रिय गौळियांचे खाये । हमामा हुंबरी नाचतसे घायें ॥३॥ एका जनार्दनीं सांडोनियां थोरपणा । खेळतांहीं न्युन न बोलें कांहीं ॥४॥