भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेविं देखोनि सकळां । आपणा न देखे हा डोळा

jevin dekhoni sakalan | apana na dekhe ha dola

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जेविं देखोनि सकळां । आपणा न देखे हा डोळा ॥१॥ परि तो न म्हणावा कीं अंध । देखणाचि तो शुध्दबुध्द ॥२॥ अवधियांतें जाणे । जाणीव जेवी आपणा नेणे ॥३॥ निळा म्हणे आहे तैसा । आत्मा आपआपणा ऐसा ॥४॥