भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैशासाठीं तैसें हावें । हें बरवें कळलेंसे

jaishasathin taisen haven | hen baraven kalalense

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जैशासाठीं तैसें हावें । हें बरवें कळलेंसे ॥१॥ उदास तूं नारायणा । मी ही म्हणा तुम्ही च ॥ध्रु.॥ ठका महाठका जोडा । जो धडफुडा लागासी ॥२॥ एकांगी च भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वें ॥३॥