भजनी मालिका

भजने

जें जें क्षेत्र जें जें स्थळीं । तें तें बळी आपुलें ठायीं ।१॥ परे ऐसें माहात्म्य नाहीं कोठें । जें प्रत्यक्ष भेटे हरिहर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरुप । पुजा ध्यान जप त्यासी नाहीं ॥१॥ वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव । तयाविण ठाव रिता कोठें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जें जें देखिलें तें तें भगलें । रुप एक उरलें विटेवरी ॥१॥ डोळियाची धनी पाहतां पुरलीं । परी वासना राहिली चरणाजवळील ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जें जें पुण्य जोडे हरिनाम गजरीं । त्याचे वांटेकरी दोघेजण ॥१॥ सावधान श्रोता आणि प्रेमळ वक्ता । जो भजे अनंता निर्विकल्प ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जे जे भक्तांची आवडी । तया संकटीं घाली उडी । वाढवी आपुली आपण गोडी । करी जोडी नामाची ॥१॥ होय तयांचा अंकित । नेणें लहान थोर मात । आपुलें आपण पुढें धांवत । न सांगतां करी सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जे जे वेळें जें जें लागे । तें न मागतां पुरवी वेगें ॥१॥ ऐसा भक्तांचा अंकित । राहे द्वारीं पैं तिष्ठत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जें जें सुख आम्हीं अनुभविलें मना । त्याचा नारायणा आठव होतो ॥१॥ ऐसें पदोपदीं निवृत्तिराज कष्टी । कोणकोणाच्या गोष्टी आठवाव्या ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जे जे होऊनियां अनुरक्त । झाले विरक्त हरिनामें ॥१॥ त्यांचे अंगी विसांवला । ह्रदयींचि राहिला प्रगटोनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा