भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें जें सुख आम्हीं अनुभविलें मना । त्याचा नारायणा आठव होतो

jen jen sukh amhin anubhavilen mana | tyacha narayana athav hoto

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जें जें सुख आम्हीं अनुभविलें मना । त्याचा नारायणा आठव होतो ॥१॥ ऐसें पदोपदीं निवृत्तिराज कष्टी । कोणकोणाच्या गोष्टी आठवाव्या ॥२॥ ज्येष्ठाच्या आधीं कनिष्ठाचें जाणें । केलें नारायणें उफराटें ॥३॥ उफराटें फार कळलें माझें मनीं । वळचणीचें पाणी आढया गेलें ॥४॥ अवघ्यापरीस कष्टी केलें मुक्ताईनें । कांहींच बोलणें घडलें नाहीं ॥५॥ नामा म्हणे विठोबा ऐकशी बोलणें । अवघियांची मनें कळवळती ॥६॥