भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें जें पुण्य जोडे हरिनाम गजरीं । त्याचे वांटेकरी दोघेजण

jen jen punya jode harinam gajarin | tyache vantekari doghejan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जें जें पुण्य जोडे हरिनाम गजरीं । त्याचे वांटेकरी दोघेजण ॥१॥ सावधान श्रोता आणि प्रेमळ वक्ता । जो भजे अनंता निर्विकल्प ॥२॥ तेणें सुखें सुख चढे नित्य नवें । जाणती अनुभवें संतजन ॥३॥ हातीं सुदर्शन आनंदें कीर्तनीं । उभा चक्रपाणी मागें पुढे ॥४॥ प्रीतीच्या वोरसें अभयदान देत । ह्लदयीं आलिंगित आपुल्या दासां ॥५॥ धर्म अर्थ काम मोक्ष आणि मुक्ति । टाकोनियां येती विश्रांतीसी ॥६॥ नामा म्हणे धन्य ते झाले संसारीं । न संडिती वारी पंढरीची ॥७॥