भजनी मालिका

भजने

चुचकारुनि गोधनें बैसविलीं आखरीं । म्हणती याहो श्रीहरी खेळों आतां ॥१॥ धावतीं वोढाळें आवरिलीं सकळें । झालों तुझिया बळें बळीवंत ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चुंबळीशीं करी चुंबळीचा संग । अंगीं वसे रंग क्रियाहीन ॥१॥ बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चुराचुराकर माखन खाया । गौळणीका नंद कुमर कन्हया ॥१॥ काहे बडाई दिखावत मोहि । जाणत हुं प्रभुपणा ते राखो भाई ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चेईला तो जाणरे सद्‍गुरुवचनीं निर्धारें । विपरीत भावना विसर पडिला कंठीं जया परिहाररे ॥१॥ आपणा पैं पहा- वया कवण लावूं दिवारे । चंद्र सूर्य जेणें प्रकाशें तो मीं कैसा पाहूं येईं रे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चेंडु देखोनियां यशोदा कोपली । ह्मणे तयेवेळीं राधिकेसी ॥१॥ महा नष्ट तुम्ही अवघिया गवळणी । माझा चक्रपाणी ब्रह्मचारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चैतन्याचा खेळ एकवट ब्रह्म । निर्गुणासी गुण रूप जाहलें ॥१॥ चैतन्य त्या कळा रूपा आले सत । निर्गुणाचा हेत रामकृष्ण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चैतन्याचा साक्षी सर्वांसी परीक्षी । अलक्षाच्या लक्षी न ये ध्याना ॥१॥ बहुत भागले बहुत श्रमले । परी नाहीं लाभलें रुप ज्यांचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चैतन्याश्रम संन्यासी जाले गृहवासी । मुळींच्या प्रकृतीसी ऐक्य केलें ॥१॥ हासिन्नले लोक बरवा हा संन्यास । करिती उपहास दर्शनाचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव