भजनी मालिका
← भजनांकडे परत

चैतन्याचा खेळ एकवट ब्रह्म । निर्गुणासी गुण रूप जाहलें

chaitanyacha khel ekavat brahma | nirgunasi gun rup jahalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चैतन्याचा खेळ एकवट ब्रह्म । निर्गुणासी गुण रूप जाहलें ॥१॥ चैतन्य त्या कळा रूपा आले सत । निर्गुणाचा हेत रामकृष्ण ॥२॥ खेळ मांडियेला गोल्हाट शिखरीं । गोलांगुळांगुळीं समाधिस्थ ॥३॥ समाधी साधन अखंड उन्मनी । औटपीट ध्वनी नाद होय ॥४॥ नामा म्हणे तेथें चौक्या ज्या रंगल्या । अरंग मिरवल्या संतसंगें ॥५॥