भजनी मालिका
← भजनांकडे परत

चेंडु देखोनियां यशोदा कोपली । ह्मणे तयेवेळीं राधिकेसी

chendu dekhoniyan yashoda kopali | hmane tayevelin radhikesi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चेंडु देखोनियां यशोदा कोपली । ह्मणे तयेवेळीं राधिकेसी ॥१॥ महा नष्ट तुम्ही अवघिया गवळणी । माझा चक्रपाणी ब्रह्मचारी ॥२॥ इतुकें ऐकोनि राधा ते चालिली । स्वगृहासी गेली आपुलिया ॥३॥ राधेचिया मनीं समजलें पूर्ण । ब्रह्मसनातन श्रीकृष्ण हा ॥४॥ इकडे यशोदा घेऊनि हरीसी । गेली मंदिरासी नामा म्हणे ॥५॥