भजनी मालिका

भजने

चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥१॥ साकरेची गोडी सारिखी सकळां । थोरां मोठ्या बाळां धाकुटियां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

चंद्र पौर्णिमेचा दिसे पा सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंधरीये ॥१॥ क्षीरसिंधुसम भीवरा ती वाहे । स्नान करितां जाय महत्पाप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चंद्र पौर्णिमेचा शोभते गगनीं । तैसा मोक्षदानी विटेवरी ॥१॥ बाळ सुर्य सम अंगकांती कळा । परब्रह्मा पुतळा विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चंद्र सूर्यादि बिंबें लिहिताती सांग । परि प्रकाशाचें अंग लिहितां नये ॥१॥ संन्यासाचीं सोंगें आणिताति सांग । परि वैराग्याचें अंग आणितां नये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चंद्रतारांगण नैऋति भास्कर । ततस्थ निर्धार ब्रह्मादिक ॥१॥ ब्रह्मादि सकळ भजनीं तत्पर । तेव्हां हरिहर नाचतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चंद्रभागा तटीं उभा वाळुवंटीं । वैजंयतीं कंठीं शोभतसें ॥१॥ गोमटें साजिरें सुकुमार ठाण । धरिलें जघन करें दोन्हीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चंद्रभागा तीर्थ पुरविला हेत । मनींचा मनोरथ अंतरींचा ॥ १ ॥ स्नान संध्या केली संध्यावळी झाली । गई वळत्या केली गोपाळपुरीं ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

चंद्रभागे तीरीं आयकिल्या गोष्टी । वाल्मीकें शतकोटी ग्रंथ केला ॥१॥ तेणें माझ्या चित्ता बहु जाले क्लेश । व्यर्थ म्यां आयुष्य गमाविलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चंद्रभागे तीरीं समपदीं उभा चैतन्याचा गाभा पाडुरंग ॥१॥ कांसे पीतांबर गळा तुळशीहार । पदक हृदयावर वैजयंती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चंद्राच्या प्रभेनें चमकती पाउलें । दुरोनि देखिलें गो-पिकांनीं ॥१॥ कृपणाचें धन होतें तें चळलें । तयांसि लाधलें अव-चिता ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चंद्र्भागतीरीम उभा राहिलासी । भक्तांचे मानसीं भाव मात्र ॥१॥ काय पुंडलिकें केल्या तपरासी । जाणोनि मानसीं भावमात्रें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव