भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंद्र पौर्णिमेचा दिसे पा सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंधरीये

chandra paurnimecha dise pa sojval | taisa shriviththal pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चंद्र पौर्णिमेचा दिसे पा सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंधरीये ॥१॥ क्षीरसिंधुसम भीवरा ती वाहे । स्नान करितां जाय महत्पाप ॥२॥ सनकसनंदनसम पुंडलीक । शोभा आलोलिक वर्णु काय ॥३॥ लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राही । एका जनार्दनीं पायीं लीन जाला ॥४॥