भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंद्राच्या प्रभेनें चमकती पाउलें । दुरोनि देखिलें गो-पिकांनीं

chandrachya prabhenen chamakati paulen | duroni dekhilen go-pikannin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चंद्राच्या प्रभेनें चमकती पाउलें । दुरोनि देखिलें गो-पिकांनीं ॥१॥ कृपणाचें धन होतें तें चळलें । तयांसि लाधलें अव-चिता ॥२॥ एकीमागें एक धांवताती नारी । आहे येथें हरी ऐसें वाटे ॥३॥ घेवोनियां रज लविताती भाळा । पाहती सकळा न्याहा- ळूनि ॥४॥ बरोबर नारी कोणी तरी असे । पाउलाचे ठसे उमटले ॥५॥ पापिणिगे आम्ही तुह्मी सकळिका । पुण्याची अधिका ह्मणून भोगी ॥६॥ बरोबरी तिसी होय अभिमान । झालासे स्वाधीन माझ्य़ा देव ॥७॥ कडे घेसी तरी येतें बरोबरी । चालवेना हरी मज आतां ॥८॥