भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंद्र सूर्यादि बिंबें लिहिताती सांग । परि प्रकाशाचें अंग लिहितां नये

chandra suryadi bimben lihitati sang | pari prakashachen ang lihitan naye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चंद्र सूर्यादि बिंबें लिहिताती सांग । परि प्रकाशाचें अंग लिहितां नये ॥१॥ संन्यासाचीं सोंगें आणिताति सांग । परि वैराग्याचें अंग आणितां नये ॥२॥ नामा म्हणे कीर्तन करिताति सांग । प्रेंमाचें तें अंग आणितां नये ॥३॥