भजनी मालिका
← भजनांकडे परत

चरण वंदिती का निंदिती । तेही हरिपदा जाती

charan vanditi ka ninditi | tehi haripada jati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चरण वंदिती का निंदिती । तेही हरिपदा जाती ॥१॥ एक तरले चरण पूजितां । कोणी तरलें चरण ध्यातां ॥२॥ चरण वंदितां तरली शिळा । निंदितां तारिले शिशुपाळा ॥३॥ ऐसें चरणाचें महिमान । एका जनार्दनीं शरणक ॥४॥