भजनी मालिका

भजने

घाव घालूं जातां देखिलें नवल । पाहातसे खळ दुष्ठ-भावें ॥१॥ परी तें होणार कदापि चुकेना । तैसीच वासना धांव घाली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥ हरीनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

घेऊनि कापड निघे बाजारासीं । आठवी देवासी वेळोवेळां ॥१॥ व्यापार तो कैंचा मज नाहीं ठावा । काय वो केशवा करुं आतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घेऊनि गोधनें जाती यमुने तटीं । नानापरी खेळ खेळताती जगजेठी ॥१॥ मेळेवोनि गोपाळ मध्यें खेळे कान्हा । न कलेचि महिमान ऐसा यादवांचा राणा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घेऊनि लवलाही गृहासी ती आली । मनी संतोषली आनंदभरित ॥१॥ पतीसी तत्वंता दिले तें पृथक । बांधावला वस्त्र धड नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घेऊनियां गुरू आले राजसभे । वंदूनियां उभे सन्मुख तो ॥१॥ ह्मणे काय पढसी तूं सांग । म्हणे लागूं वेगें हरीहरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

घेऊनियां पत्र केली प्रदक्षिणा । साष्टांगी ब्राह्मणां नमन केलें ॥१॥ मागोनियां म्हैसा नेवाशासी आले । प्राकृत पैं केली गीतादेवी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

घेऊनियां हातीं काठी । पोरा खेळसी सुरकांडी रे ॥१॥ खेळे सुरकांडी पोरा खेळे सुरकांडी । विषयांची वासना धरुनी चढसी प्रपंचाचे झांडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

घेसी तरी घेई संताची भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥१॥ सर्वभावें त्यांचें देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम