भजनी मालिका
← भजनांकडे परत

घेऊनि गोधनें जाती यमुने तटीं । नानापरी खेळ खेळताती जगजेठी

gheuni godhanen jati yamune tatin | nanapari khel khelatati jagajethi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घेऊनि गोधनें जाती यमुने तटीं । नानापरी खेळ खेळताती जगजेठी ॥१॥ मेळेवोनि गोपाळ मध्यें खेळे कान्हा । न कलेचि महिमान ऐसा यादवांचा राणा ॥२॥ नानापरींचे खेळ खेळती गोपाळ । नाचती गदारोल मिळोनी सकळ ॥३॥ एका जनार्दनी खेळे मदनपुतळा । नंदरायाचा कुमरु म्हणतात सांवळा ॥४॥