भजनी मालिका
← भजनांकडे परत

घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया

ghein mi janma yajasathin deva | tujhi charanaseva sadhavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥ हरीनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥ आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःख नाहीं चाड आम्हां ॥२॥ आणीक सायास न करीं न धरीं आस । होईन उदास सर्व भावें ॥३॥ मोक्ष आम्हां घरीं कामारी ते दासी । होय सांगों तैसी तुका म्हणे ॥४॥