भजनी मालिका
← भजनांकडे परत

घाव घालूं जातां देखिलें नवल । पाहातसे खळ दुष्ठ-भावें

ghav ghalun jatan dekhilen naval | pahatase khal dushtha-bhaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
घाव घालूं जातां देखिलें नवल । पाहातसे खळ दुष्ठ-भावें ॥१॥ परी तें होणार कदापि चुकेना । तैसीच वासना धांव घाली ॥२॥ धाकुटी हरणी पाडसें धाकुटीं । सांडी उठाउठी आली तेथें ॥३॥ पाहों जातां पाशीं गुंतला तो मृग । तेव्हां काय मग केलें तिनें ॥४॥ मुखाप्रती मुख लाऊनि चुंबिलें । ह्लदय फुटलें देख-तांचि ॥५॥ सुख दु:ख बोल बोलती ते वेळें । म्हणती कपाळीं भोग होता ॥६॥ सोडविता कोणी न दिसे ये काळीं । काळाची पडली उडी आतां ॥७॥ नामा ह्मणे खळा कळे त्याची वाणी । ऐकाया लागूनि स्थिर झाला ॥८॥