भजनी मालिका
← भजनांकडे परत

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें

ghei ghei majhe vache | god nam vithobachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥ तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ध्रु.॥ तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥२॥ मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायीं ॥३॥ तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥४॥