भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटेवरी उभा। जैसा लावण्याचा गाभा

vitevari ubha| jaisa lavanyacha gabha

रचनाकार: संत सेना · अभंग
विटेवरी उभा। जैसा लावण्याचा गाभा ॥१॥ पायीं ठेउनियां माथा । अवघी वारली चिंता॥२॥ समाधान चित्ता। डोळा श्रीमुख पाहतां ॥३॥ बहू जन्मी केला लाग। सेना देखे पांडुरंग ॥४॥