भजनी मालिका
← भजनांकडे परत

वासुदेव टळोनि गेले प्रहर तीन । काय निजतां झांकोन लोचन आलों मागावया दान । नका विन्मुख होऊं जाण गा

vasudev taloni gele prahar tin | kay nijatan jhankon lochan alon magavaya dan | naka vinmukh houn jan ga

रचनाकार: संत सेना · अभंग
वासुदेव टळोनि गेले प्रहर तीन । काय निजतां झांकोन लोचन आलों मागावया दान । नका विन्मुख होऊं जाण गा ॥१॥ रामकृष्ण वासुदेवा। जाणवितो सकल जिवा। द्या मज दान वासुदेवा। मागुता फेरा नाहीं या गांवा गा ॥२॥ आलों दुरुनी सायास। द्याल दान मागायास। नका करू माझी निरास । धर्मसार फळ संसारास गा ॥३॥ एक भाव देवाकारणें। फारसे नलगे देणें घेणें। करा एकचित्त रिघा शरण । हेंचि मागणें तुम्हांकारणें गा ॥४॥ नका पाहू काळ वेळां । दान देई वासुदेवा। व्हां सावध झोपेला। सेना न्हावी चरणी लागला गा ॥५॥