भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचे म्हणतां निरवृत्ति । अवघी निरसली भ्रांती

vache mhanatan niravrutti | avaghi nirasali bhranti

रचनाकार: संत सेना · अभंग
वाचे म्हणतां निरवृत्ति । अवघी निरसली भ्रांती ॥१॥ हें तो माझ्या अनुभवा। प्रत्यया आले जीवा ॥२॥ गुंतलो होतो मोह आशा । स्मरतां पावलों नाशा ॥३॥ ऐसा अनुभव नामाचा। सेना न्हावी स्मरे वाचा ॥४॥