भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदार तुम्ही संत। मायबाप कृपावंत

udar tumhi sant| mayabap krupavant

रचनाकार: संत सेना · अभंग
उदार तुम्ही संत। मायबाप कृपावंत ॥१॥ केवढा केला उपकार । काय वाणू मी पामर ॥२॥ जड जीवा उद्धार केला। मार्ग दाखविला सुपंथ ॥३॥ सेना म्हणे उतराई। होता कांहीं दिसेना ॥४॥