भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिणसो भरोवरी । वांया कासया येरझारी

shinaso bharovari | vanya kasaya yerajhari

रचनाकार: संत सेना · अभंग
शिणसो भरोवरी । वांया कासया येरझारी ॥१॥ वेद मंथोनियां। नाम काढिले लवलाह्या ॥२॥ आणिक साधन। नाहीं नाहीं नामाविण ॥३॥ सेना म्हणे केला नेम । वस्ती राहे पुरुषोत्तम ॥४॥