भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाचें चिंतन श्रेष्ठ पैं साधन। जातील जळोनि महापापें

namachen chintan shreshtha pain sadhan| jatil jaloni mahapapen

रचनाकार: संत सेना · अभंग
नामाचें चिंतन श्रेष्ठ पैं साधन। जातील जळोनि महापापें ॥१॥ नलगे धूम्रपान पंचाग्निसाधन । करितां चिंतन हरी भेटे ॥ २॥ बैसुनि निवांत करा एकचित्त । आवडी गायें गीत विठोबाचें ॥ ३॥ सकळाहुनि सोपें हेंची पैं साधन। सेना म्हणे आण विठोबाची ॥४॥