भजनी मालिका
← भजनांकडे परत

नलगे योग तप। करणें साटोप आम्हांसी

nalage yog tap| karanen satop amhansi

रचनाकार: संत सेना · अभंग
नलगे योग तप। करणें साटोप आम्हांसी ॥१॥ सोपे साधन आमुचें। नाम गाऊं विठोबाचें ॥२॥ जो नातुडे धूम्रपानीं । राहे संपुष्टि येऊनि ॥३॥ जया नाहीं रूप । आम्हां कीर्तनीं समीप ॥४॥ सेना म्हणे लडिवाळ। जाणो हरीसी निर्मळ ॥ ५॥