भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितों विनवणी । हात जोडोनियां दोन्ही

kariton vinavani | hat jodoniyan donhi

रचनाकार: संत सेना · अभंग
करितों विनवणी । हात जोडोनियां दोन्ही ॥१॥ हेंचि द्यावे मज दान । करा हरीचें चिंतन ॥२॥ जातों सांगूनियां मात । पांडुरंग बोलावित ॥३॥ सोडा द्वादशी पारणें । सुखें करावें कीर्तन ॥४॥ दिवस मध्यान्हीं आला। सेना वैकुंठासी गेला ॥५॥