भजनी मालिका
← भजनांकडे परत

करा हाचि विचार । तरा भवसिंधु पार

kara hachi vichar | tara bhavasindhu par

रचनाकार: संत सेना · अभंग
करा हाचि विचार । तरा भवसिंधु पार ॥१॥ धरा संतांची संगती। मुखीं नाम अहोराती ॥२॥ अजामीळ पापराशी । पार पावविलें त्यासी ॥३॥ नका धुरें भरूं डोळा। सेना सांगे वेळोवेळां ॥४॥