भजनी मालिका
← भजनांकडे परत

गिरजेप्रती शंकर उपदेशिले। तो गुह्य मंत्र सप्त समुद्रापलीकडे

girajeprati shankar upadeshile| to guhya mantra sapta samudrapalikade

रचनाकार: संत सेना · अभंग
गिरजेप्रती शंकर उपदेशिले। तो गुह्य मंत्र सप्त समुद्रापलीकडे ॥१॥ ऐसें निज गुज साराचेंही सार। उघडे दाविलें साचार ज्ञानदेवें ॥२॥ हे सुखाचें सुख साधन। भक्तिज्ञानाचें अंजन । हेचि परब्रह्म जीवन ॥३॥ हेंचि मुख निज राममंत्र सार । सुलभ साकार सेना ध्याये निरंतर ॥४॥