भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरासी आले संत देखोनिया। म्हणे यासी खावया कोठुनी घालूं

gharasi ale sant dekhoniya| mhane yasi khavaya kothuni ghalun

रचनाकार: संत सेना · अभंग
घरासी आले संत देखोनिया। म्हणे यासी खावया कोठुनी घालूं ॥१॥ ऐसा हा निर्धारीम दुष्ट दुराचारी। जन्मोनियां झाला भूमि भारी ॥२॥ दासीचें आर्जव करोनि भोजन । घाली समाधान करी तीचें ॥३॥ आणि आवडीनें करी तिची सेवा । म्हणे सुख जीवा फार माझ्या ॥४॥ संतानीं पाणी मागतां म्हणे काय । मोडले की पाय जाय आणि ॥५॥ सेनां म्हणे कारे गाढवा नेणसी । कुंभपाक वस्तीसि केला आहे ॥६॥