भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्तीं पाय रूप डोळां । मुखीं नाम वेळोवेळा

chittin pay rup dolan | mukhin nam velovela

रचनाकार: संत सेना · अभंग
चित्तीं पाय रूप डोळां । मुखीं नाम वेळोवेळा ॥१॥ हेंचि मागे तुजपाशीं। भाव खरा कीं जाणसी ॥२॥ हे उचित तुमचें। कोड पुरवा बालकाचे ॥३॥ नको देऊं अंतर । सेना लोखे पायांवर ॥४॥