भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसोनि कीर्तनांत । गोष्टी सांगतो निश्चित

baisoni kirtanant | goshti sangato nishchit

रचनाकार: संत सेना · अभंग
बैसोनि कीर्तनांत । गोष्टी सांगतो निश्चित ॥१॥ दुष्ट अधम तो खरा । येथुनियां दूर करा ॥ २॥ तमाखु ओढूनि सोडी धूर । दुष्टबुद्धि दुराचार ॥३॥ पान खाय कीर्तनांत । रुधिर विटाळशीचें पीत ॥४॥ त्याची संगती जयास । सेना म्हणे नर्कवास ॥५॥