भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां हेंचि अळंकार। कंठीं हार तुळशीचें

amhan henchi alankar| kanthin har tulashichen

रचनाकार: संत सेना · अभंग
आम्हां हेंचि अळंकार। कंठीं हार तुळशीचें ॥ १॥ नाम घेऊं विठोबाचें । म्हणवूं डिंगर तयाचें ॥ २॥ चित्तीं चाड नाहीं न धरू आणिकाची कांहीं ॥३॥ सकळ सुख त्याचे पायीं । मिळे बैसलिया ठायीं ॥४॥ सेना म्हणे याविण कांहीं । मोक्ष युक्ति चाड नाहीं ॥५॥