भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलिंगन भेटी। मग चरणीं घाली मिठी

alingan bheti| mag charanin ghali mithi

रचनाकार: संत सेना · अभंग
आलिंगन भेटी। मग चरणीं घाली मिठी ॥१॥ ऐसा माझा भोळा भाव। पंढरिराव जाणता ॥२॥ घेतलें हिरोनी। सीणभाग चक्रपाणी ॥३॥ सेना म्हणे मायबापें। द्यावें भातें हें आतां ॥४ ॥