भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

गुडघेमेटाइ बैसले तोंडी खरस आलें । ते असे देखिले रामकृष्णें ॥१॥ मोहरी काढोनि लावियली मुखा । नांदे तिहीं लोकां मोहियलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुंतला सर्प भुलला नादा । तैसी प्राणियासी आपदा संसाराची ॥१॥ सदा तळमळ मन नाहीं स्थिर । भोगिती अघोर जन्मोजन्मीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुंतलासी मायापाशी । कोण सोडवील तुजसी । धाये मोकलेनि रडसी । न ये करूणा कवणातें ॥१॥ वाचे सदा नाम गाय । तेणें चुकती अपाय । सहजची सोय । नाम मुखीं वदतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुतंली भ्रमर कमळणी कोशीं । आदरें आमोदासी सेवितसे ॥१॥ तैसें रामनामीं लागतां ध्यान । मन उन्मन होय जाण रामनामीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुंतलों प्रपंचीं सोडवी गा देवा । देई तुझी सेवा जीवेंभावें ॥१॥ न लगे धन मान पुत्र दारा वित्त । सदां पायीं चित्त जडोनि राहो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुरु जनार्दन सांगे राममंत्र । पूजावे पवित्र द्विजवर ॥१॥ जोडिली संपदा ब्राह्मणासी द्यावी । अखंड करावी चरणसेवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुरुमुखें घेतां तो निर्दोष । येर्‍हर्वीं आयास पडे कष्ट ॥१॥ राम कृष्न हरिमंत्र हा सोपा । उच्चारितां खेपा खंडे कर्म ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गुरुस्मरण करितां देख । स्मरणें विसरे तहानभुक ॥१॥ आसनीं शयनीं भोजनीं । गुरुतें न विसंबे ध्यानीं मनीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गेला आपुल्या गृहाप्रती । बाळ तो निद्रा न करी रात्रीं । क्षुधा लागलीसे बहुती । मागे दूधभात जेवाया ॥१॥ पुढें ती करड्या वांटुनी । काढिले शुभ्रपाणी । येरें टाकिलें थुंकोनी । म्हणे माते कालीचें नव्हे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गो गोरसातीत स्वानंद साखरेसी । प्रेमें पेहें पाजीन संख्या सोयर्‍यासी ॥१॥ घेई घेई बाळा घोट एक । झणी पायरव होईल कुशलीं पडे तर्क ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोकुळामाजी कृष्णें नवल केलें । स्त्री आनि भ्रतारा विंदान दाविलें ॥१॥ खेळ मांडिला हो खेळ मांडिला । न कळे ब्रह्मादिकां अगम्य त्याची लीळां वो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोकुळीं आनंद जाहला । रामकृष्ण घरा आला । नंदाच्या दैवाला । दैव आलें अकस्मात ॥१॥ श्रावण वद्य अष्टमीसीं । रोहिणी नक्षत्र ते दिवशी । बुधवार परियेसी । कृष्णमूर्ति प्रगटलीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोकुळी गोपाळसवें खेळतसे देव । ऐक प्रेमभाव तयांचा तो ॥१॥ गोधनें राखणें उच्छिष्ट खादणें । कालाहि करणे यमुनेतीरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोकुळीं गोमाई गवळणी । तिच्या सुना चवघी जणीं । यमुने गेल्या एके दिनीं । त्यांनी कृष्ण पहिला ॥१॥ कृष्णा पाहतां मधुसूदन । मोहिलें चवघीचें मन । कृष्ण कृष्ण लागलें ध्यान । देहभान विसरल्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ