भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुडघेमेटाइ बैसले तोंडी खरस आलें । ते असे देखिले रामकृष्णें

gudaghemetai baisale tondi kharas alen | te ase dekhile ramakrushnen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गुडघेमेटाइ बैसले तोंडी खरस आलें । ते असे देखिले रामकृष्णें ॥१॥ मोहरी काढोनि लावियली मुखा । नांदे तिहीं लोकां मोहियलें ॥२॥ तयांमध्ये म्हणे गडे हो ऐका । पळालीसे देखा भिउनी तुम्हां ॥३॥ मोहियलें मन सर्वांचे भावें । एका जनार्दनीं देवें नवल केलें ॥४॥