भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरु जनार्दन सांगे राममंत्र । पूजावे पवित्र द्विजवर

guru janardan sange ramamantra | pujave pavitra dvijavar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गुरु जनार्दन सांगे राममंत्र । पूजावे पवित्र द्विजवर ॥१॥ जोडिली संपदा ब्राह्मणासी द्यावी । अखंड करावी चरणसेवा ॥२॥ ब्राह्मणाचें तीर्थ जे नर सेविती । हरिहर येती वंदावया ॥३॥ ब्राह्मणाचें तीथ ज्या नर मस्तकीं । सायुज्यता मुक्ति पायां लागे ॥४॥ एका जनार्दनीं मुक्ति हे तो वाव । भजा हे भूदेव कोटी जन्मीं ॥५॥