भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुणदोष नायकावे कानीं । सदा वाचा नामस्मरणीं

gunadosh nayakave kanin | sada vacha namasmaranin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गुणदोष नायकावे कानीं । सदा वाचा नामस्मरणीं ॥१॥ हेंचि परमार्थचें सार । मोक्ष मुक्तिचे भांडार ॥२॥ साधे सर्व योगस्थिती । द्वेष धरुं नये भूतीं ॥३॥ सर्वाठायीं जनार्दन । म्हणोनि वंदावे ते जन ॥४॥ खूण सांगे जनार्दन । एका जनार्दनीं पूर्ण ॥५॥