भजनी मालिका

भजने

तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूं चि माझें हित करिता देवा ॥१॥ तूं चि माझा देव तूं चि माझा जीव । तूं चि माझा भाव पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तूं माझी जननी काय गे साजणी । विठ्ठले धांवोनि भेट देई ॥१॥ डोळे माझे शिणले पाहतां वाटोली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली पांडुरंगे ॥१॥ तूं मज येकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

तूं माझी माउली मी बो तुझा तान्हा । पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ॥१॥ तूं माझी गाउली मी तुझें वासरूं । नको पान्हा चोरूं पांडुरंगे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तूं माय माउली आस केली थोरी । वास निरंतरीं पंढरिये ॥१॥ स्वरूप दाखवी एक वेळां मज । धरूं नको लाज पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तूं माय माउली म्हणोनि आस केली । विठ्ठलें पाहिली वास तुझी ॥१॥ मज कां मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें ह्रदय तुझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तू म्हणशील बा हें माझें । वायां वाहसी वाउगें ओझें ॥१॥ सोडी दे टाकूनी परता येई । रामनाम वाचे सदा गाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तूंचि अनाथाचा दाता । दुःख मोह नासावया चिंता । शरण आलों तुज आतां । तारीं कृपावंता मायबापा ॥१॥ संतसंगति देई चरणसेवा । जेणें तुझा विसर न पडावा । हा च भाव माझिया जीवा । पुरवीं देवा मनोरथ ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

तृणाचिया लोभेम गायी गेल्या दुरी । पाचारी मुरारी नामें त्यांचीं ॥१॥ चंद्रभागे गंगे भागीरथी यमुने । येईं ताम्रपर्णे धांवोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव