भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली पांडुरंगे

tun majhi mauli tun majhi sauli | pahaton vatuli pandurange

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली पांडुरंगे ॥१॥ तूं मज येकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥२॥ तुका म्हणे जीव तुजपाशीं असे । तुझियानें ओस सर्व दिशा ॥३॥