भजनी मालिका
← भजनांकडे परत

तृप्ति भुकेली काय करुं माये

trupti bhukeli kay karun maye

तृप्ति भुकेली काय करुं माये । जीवनीं जीवन कैसें तान्हेजत आहे ॥१॥ मन धालें परि न धाये । पुढत पुढती राजा विठ्ठलु पाहे ॥२॥ निरंजनीं अंजन लेइजत आहे । आपुलें निधान कैसें आपणची पाहे ॥३॥ निवृत्ति गार्हस्थ्य मांडले आहे । निष्काम आपत्य प्रसवत जाये ॥४॥ त्रिभुवनीं आनंदु न मायेगे माये । आपेआपु परमानंदु वोसंडतु आहे ॥५॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलुगे माये । देहभाव सांडूनि भोगिजत आहे ॥६॥