भजनी मालिका

भजने

सांवळें सानुलें म्हणती तान्हुलें । खेळें तें वहिलें वृंदावनीं ॥१॥ नागर गोमटें शोभे गोपवेषें । नाचत सौरसे गोपाळासीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥ आणीक कांहीं इच्छा आम्हां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सांवळेचें तेज सांवळे बिंबलें । प्रेम तें घातलें ह्रदयघटीं ॥१॥ निरालंब बाज निरालंब तेज । चित्तरस निज निजतेजें ॥ध्रु०॥

सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि ॥१॥ सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

साहोनियां टोले उरवावें सार । मग अंगीकार ख†या मोलें ॥१॥ भोगाचे सांभाळीं द्यावें कलेवर । संचिता चि थार मोडूनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सिकविला तैसा पढों जाणे पुसां । कैंची साच दशा तैसी अंगीं । स्वप्नींच्या सुखें नाहीं होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां ॥१॥ न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सिंदळीचे चित्त परपुरुषावारी । पति चुरमुरी रात्रंदिवस ॥१॥ ऐसे ते वोंगळी जाय हो नरका । तिच्या दोषें देखा पती जाय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सिंदळीचे सोयरे चोराचीया दया । ते ही जाणा तया संवसर्गी ॥१॥ फुकासाठी भोगे दुःखाचा वाटा । उभारोनी कांटा वाटेवरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । राहे बीज त्यास काय करी ॥१॥ अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देईल कोण काका त्याचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ॥१॥ आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सिद्ध ब्रह्मज्ञान बोलतां नोहे वाचें । शांतवन क्रोधाचें झालें नाहीं ॥१॥ पाल्हाळ लटिका करणें तो काय । शरण पंढरीराया गेला नाहीं ॥२॥

रचनाकार: संत सेना

सिद्धि साधक जया ह्रुदयीं ध्याती । तो गोपिकेचा पती विठ्ठलराव ॥१॥ सांवळे सांवळें रुप तें सांवळें । देखितांचि डोळे प्रेमयुक्त ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ