भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिंदळीचे चित्त परपुरुषावारी । पति चुरमुरी रात्रंदिवस

sindaliche chitta parapurushavari | pati churamuri ratrandivas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सिंदळीचे चित्त परपुरुषावारी । पति चुरमुरी रात्रंदिवस ॥१॥ ऐसे ते वोंगळी जाय हो नरका । तिच्या दोषें देखा पती जाय ॥ध्रु.॥ आपण बुडती पती बुडविती । दोन्ही कुळे नेती अधःपाता ॥२॥ तुका म्हणे तिची न करावी संगती । होईल फजिती मागें पुढें ॥३॥