भजनी मालिका
← भजनांकडे परत

साहोनियां टोले उरवावें सार । मग अंगीकार ख†या मोलें

sahoniyan tole uravaven sar | mag angikar kha†ya molen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साहोनियां टोले उरवावें सार । मग अंगीकार ख†या मोलें ॥१॥ भोगाचे सांभाळीं द्यावें कलेवर । संचिता चि थार मोडूनियां ॥ध्रु.॥ महत्वाचे ठायीं भोगावी अप्रतिष्ठा । विटवावें नष्टां पंचभूतां ॥२॥ तुका म्हणे मग कैंचा संवसार । जयाचा आदर तें चि व्हावें ॥३॥