सांगेन तें हित धरा अवघें मनीं । नका मन कोणी वीट याचा
sangen ten hit dhara avaghen manin | naka man koni vit yacha
सांगेन तें हित धरा अवघें मनीं । नका मन कोणी वीट याचा ॥१॥ बरें शिकवितां बरें तें माना वाईटा त्यागावें त्यागवितां ॥२॥
sangen ten hit dhara avaghen manin | naka man koni vit yacha
सांगेन तें हित धरा अवघें मनीं । नका मन कोणी वीट याचा ॥१॥ बरें शिकवितां बरें तें माना वाईटा त्यागावें त्यागवितां ॥२॥
sangel khun pari hen na kale | nughadatan dole budhdiche
सांगेल खूण परि हें न कळे । नुघडतां डोळे बुध्दीचे ॥१॥ याचिलागीं चित्तशुध्दी । करा हो उपाधी निरसुनी ॥२॥
sangon kay nena deva | bolachi tya avadi
सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी ॥१॥ वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ध्रु.॥
sangon janati shakun | bhut bhavishya vartaman
सांगों जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ॥१॥ त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहों नावडती डोळां ॥ध्रु.॥
sango jatan na kale vacha | mahima kathecha apar
सांगो जातां न कळे वाचा । महिमा कथेचा अपार ॥१॥ श्रवणें पठणें हरिची कीर्ती । नाना याति उध्दारल्या ॥२॥
sango jatan shabdachi vire | jenvi andharen ravibhetin
सांगो जातां शब्दचि विरे । जेंवि अंधारें रविभेटीं ॥१॥ सागरीं ठाव बुडीही देतां । न लभेची सर्वथा निर्बुजला ॥२॥
sango navarasalakshan | tari shrungar hasya karun | dhir vir bhayanak jan | bibhatsa adabhut shantaras
सांगो नवरसलक्षण । तरी शृंगार हास्य करुण । धीर वीर भयानक जाण । बीभत्स अदभुत शांतरस ॥१॥ शृंगारिक तें माधुर्य गाणें । हास्य तें विनोदकरणें । कारुण्य तें कींव भाकणें । धैर्य उपजवणें तें धीर ॥२॥
sach jen hoten ten disoniyan alen | atan mi na bole tumhan kanhin
साच जें होतें तें दिसोनियां आलें । आतां मी न बोले तुम्हां कांहीं ॥१॥ तुमचें उचित तुम्हींच करावें । आम्हीं सुखें पाहावें होय तैसें ॥२॥
sach maj kay kalon naye deva | kay tujhi seva kahe navhe
साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥१॥ करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥ध्रु.॥
sach majha devhara | bhak theva bhav khara | trigunacha phulavara | ana vinanti sangaton
साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनंति सांगतों ॥१॥ माझें दैवत हें रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं । भरलें मग अंगीं । निवाड करी दोहींचा ॥ध्रु.॥
sach ha viththal sach hen karanen | sant jen vachanen boliyele
साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जें वचनें बोलियेले ॥१॥ साच तें स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥२॥
sachapanen deva sharan pain jati | taya vaikunthapati visarena
साचपणें देवा शरण पैं जाती । तया वैकुंठपती विसरेना ॥१॥ जैसी कन्या दुरदेशीं एकटी । रात्रंदिवस संकटीं घोकी मायबाप ॥२॥
sachapanen brid sodanin tujhya | atan keshiraja pan hachi
साचपणें ब्रीद सोडनिन तुझ्या । आतां केशिराजा पण हाचि ॥१॥ लबाड तूं देवा लबाड तूं देवा । लबाड तूं देवा ठावा आम्हां ॥२॥
sachapanen majhen karaven dhanvanen | kaya vacha manen sharan tumhan
साचपणें माझें करावें धांवणें । काया वाचा मनें शरण तुम्हां ॥१॥ अहो पंढरीया नका आतां दुजें । विश्रांती सहज तवचरणीं ॥२॥
sajiren sundar shrimukh pahatan | nathave ti chinta sansarachi
साजिरें सुंदर श्रीमुख पाहतां । नाठवे ती चिंता संसाराची ॥१॥ तो हा पाडुरंग विटेवरी उभा । त्रैलोक्याचा गाभा शोभतसे ॥२॥
saje alankar | tari bhogitan bhratar
साजे अळंकार । तरि भोगितां भ्रतार ॥१॥ व्यभिचारी चा टाकमटिका । उपहास होती लोकां ॥ध्रु.॥
sanje osaratan sant
सांजे ओसरतां सांत । वांया करावा आकांत तैसीं सखीं जिवलगें ।
santavila hari | jinhin hrudayamandirin
सांटविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं ॥१॥ त्यांची सरली येरझार । जाला सफळ व्यापार ॥ध्रु.॥
santavile van | pais ghatala dukan
सांटविले वाण । पैस घातला दुकान ॥१॥ जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्ध चि जवळी ॥ध्रु.॥
sathi ghadimaji | ek vechin devakajin
साठी घडीमाजी । एक वेचीं देवकाजीं ॥१॥ आरा-णूक सारूनि काजीं । सर्वभावें केशव पूजीं ॥२॥