भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगो जातां शब्दचि विरे । जेंवि अंधारें रविभेटीं

sango jatan shabdachi vire | jenvi andharen ravibhetin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सांगो जातां शब्दचि विरे । जेंवि अंधारें रविभेटीं ॥१॥ सागरीं ठाव बुडीही देतां । न लभेची सर्वथा निर्बुजला ॥२॥ यापरि शब्द न पवेचि तेथें । कैसेनि सुखातें अनुवादें ॥३॥ निळा म्हणे जाणती संत । आहे सिध्दांत तेथींचा तो ॥४॥