भजनी मालिका
← भजनांकडे परत

साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे

sach maj kay kalon naye deva | kay tujhi seva kahe navhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥१॥ करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥ध्रु.॥ शुद्ध माझा भाव होईल तुझे पायीं । तरि च हें देई निवडूनि ॥२॥ उचित अनुचित कळों आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥३॥ तुका म्हणे मज पायांसवे चाड । सांगसी तें गोड आहे मज ॥४॥