भजनी मालिका
← भजनांकडे परत

साचपणें ब्रीद सोडनिन तुझ्या । आतां केशिराजा पण हाचि

sachapanen brid sodanin tujhya | atan keshiraja pan hachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
साचपणें ब्रीद सोडनिन तुझ्या । आतां केशिराजा पण हाचि ॥१॥ लबाड तूं देवा लबाड तूं देवा । लबाड तूं देवा ठावा आम्हां ॥२॥ काय सूर्यपणें सांगशिल गोष्टी । थोरपणें मोठीं पुरे आताम ॥३॥ नामा म्हणे काय खवळिसि आम्हां । लाज नाहीं तुम्हां कवणेविसीं ॥४॥