भजनी मालिका

भजने

आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडुं । खेळे विटिदांडु पोरा खेळे विटिदांडु ॥१॥ सत्व विटी घेउनि हातीं धीर धिर दाडु । भावबळें टोला मारी नको भिऊं गांडु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवली हरी भाविकांसीं ॥१॥ म्हणोनि आभावें ठाकतीं गोपिका । त्या यदुनायका न धरती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आमचा तूं ॠणी ठायींचा चि देवा । मागावया ठेवा आलों दारा ॥१॥ वर्म तुझें आम्हां सांपडलें हातीं । धरियेले चित्तीं दृढ पाय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमची कां नये तुह्मासी करुणा । किती नारायणा आळवावें ॥१॥ काय जाणां तुह्मी दुर्बळाचें जिणें । वैभवाच्या गुणें आपुलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमची गोसावी आयचित वृत्ती । करवी शिष्या हातीं उपदेश ॥१॥ दगडाची नाव आधींच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

आमची जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें ॥१॥ लागेल तरीं कोणी घ्यावें धणीवरी । आमुपचि परी आवडीच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमच्या कपाळें तुज ऐसी बुद्धी । धरावी ते शुद्धी योगा नये ॥१॥ काय या राहिलें विनोदावांचून । आपुलिया भिन्न केलें आम्हां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आमिश लाउनी मीनातें गोविती । तैसी संसारस्थिती जाण बापा ॥१॥ पान लागलिया गूळ न म्हणे गोड । नामामृतीं चाड न धरती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आमिष देखोनि मीन गुंतलासे गळीं । तैसा काळ बळी पाश घाली ॥१॥ आप्त गोत्रज असोनि जवळी । नेताती वहिली यमकाळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ